घरासमोर झोपलेले असताना मोबाईलसह सोन्याची बाळी लंपास


। अहमदनगर ।  दि.14 जून ।  घरासमोर झोपलेल्या उशाला ठेवलेला 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल, 3 हजार रुपये किमतीची सोन्याची बाळी असा ऐवज चोरुन नेला. ही घटना नगर तालुक्यातील पोखर्डी, गावाचे शिवारातील शेंडी येथील खडी क्रेशर येथे घडली.

राजेंद्र फाळके यांच्या घरावर लिहले ‘गद्दार’ 

 या बाबतची माहिती अशी की अभिषेक डमाळ हे घराचे समोर झोपलेले असतांना त्यांच्या ऊशा खाली ठेवलेला  मोबाईल व सोन्याची बाळी असा 18 हजार रुपये किमतीचा ऐवज कोणीतरी अज्ञात इसमाने स्वताच्या आर्थिक फायद्याकरीता लबाडीचे ईराद्याने चोरून नेला.

बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ 

 या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अभिषेक बाऴासाहेब डमाळ, ( रा- खडी   क्रेशर  शेंडी पोखर्डी, ता.नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्या विरुध्द भा दवि का कलम 379 अन्वये चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस नाईक संदिप आव्हाड करीत आहे.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे गंठण पळवले 

Post a Comment

Previous Post Next Post