। अहमदनगर । दि.11 नोव्हेंबर । किराणा दुकानातून सामान घेऊन येते असे सांगून घराबाहेर गेलेली 21 वर्षीय विवाहित महिला कोठेतरी निघून गेली. ती अद्याप परतली नाही. ही घटना शनिवारी दि.5 रोजी केडगाव येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की शकील सुभाष भोसले (वय 23 वर्षे, रा.मु.पो. खर्डे, ता. पाथर्डी जि.अहमदनगर, ह. रा. पोतदार शाळेजवळ, शिवाजीनगर, केडगाव, अहमदनगर) हे दि.5 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरी असताना त्यांची पत्नी पूजा ही किराणा दुकानातून सामान आणते असे सांगून गेली असता
त्यानंतर बराच वेळ झाल्यानंतरही पत्नी घरी आली नसल्यामुळे शकील भोसले याने त्या भागातील किराणा दुकानांजवळील परिसरात पाहणी केली, परंतु पत्नी कोठेही मिळून आली नाही. त्यांनी केडगाव व अहमदनगर शहरातील परिसरात व आजूबाजूस तसेच नातेवाईकांकडे सुध्दा विचारपूस केली, परंतु पत्नी त्यांना कोठेही मिळून आली नाही.
त्यामुळे शकील भोसले यांनी दिलेल्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली. महिलेचे वर्णन ः नाव- पूजा शकील भोसले, वय 21 वर्षे, उंची 5 फुट, रंग गोरा, शरीरबांधा- मध्यम, केस काळे व लांब, चेहरा गोल, नाक सरळ, पेहराव अंगात काळ्या रंगाची साडी व त्यावर पिवळे रंगाचे ब्लाऊज, पायात सँडल सोबत मोबाईल फोन 9373194125 नंबर असलेला आहे.
या वर्णनाची महिला कोणाला आढळल्यास अगर तिच्याबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे फोन नंबर 0241-2416117 फोनवर संपर्क करावा.
--------
💥 काळ भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त आगडगावमध्ये बुधवारी कार्यक्रम
💥 सावेडीत महिलेचे मिनी गंठण चोरट्यांनी ओरबडले
💥 अहमदनगर जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी