। अहमदनगर । दि.11 नोव्हेंबर । दुचाकीवरून जाणार्या महिलेचे दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण चोरट्यांनी ओरबडले. सावेडीतील गुलमोहर रस्त्यावर परिजात चौकात गुरूवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपाली सोहम आंधळे (रा. निर्मलनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या नणंद सानिका संजय आंधळे यांच्यासमवेत दुचाकीवरून गुरूवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता परिजात चौकातून जात होत्या. त्यावेळेस पल्सर दुचाकीवर पाठीमागून आलेल्या दोघांनी दिपाली यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने हिसकावून घेतले.
दोघे ही वेगात कुष्ठधामच्या दिशेने निघून गेले. दोघा चोरट्यांनी अंगात काळ्या रंगाचे जर्किन आणि काळे मास्क घातले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------
💥अहमदनगर जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
💥महिलेला आमिष दाखवून सहा लाखाला फसवले
💥लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ४ हजार ६२ पशुपालकांच्या खात्यांवर १० कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा