नगरला नुतन पोलिस अधिक्षक म्हणून राकेश ओला यांची नियुक्ती


। अहमदनगर । दि.21 ऑक्टोबर । अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर येथून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राकेश ओला यांची नियुक्ती झाली आहे. तसा अध्यादेश शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस अधिकार्‍यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनं दिवाळीपूर्वीचं पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केला आहे.

या निर्णयानुसार 43 अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

------

अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 2800 बचत गट निर्माण करणार 

५ जी तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण

भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 964 कोटींची कर्जमाफी; 

 

Post a Comment

Previous Post Next Post