। अहमदनगर । दि.14 ऑक्टोबर । अल्पवयीन मुलास स्वतःच्या फायद्यासाठी चहाच्या दुकानात कामावर ठेवल्याचे आढळून आल्याची घटना नगर शहरातील माळीवाडा येथील नवनाथ टी सेंटर येथे घडली.
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कामगार अधिकारी यास्मीन अब्दुलगनी शेख (वय 41, रा. बालिकाश्रम रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मंगळवारी सकाळी माळीवाडा भागातील विशाल गणपतीजवळ ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत शेख यांच्यासह बाल कामगार कृती दलाचे अंबादास केदार, राकेश जाधव, कोतवाली पोलिस ठाण्याचे अंमलदार के.डी.शिरसाठ, कावेरी फुगारे तसेच चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी अलिम अय्युब पठाण, मंजुषा गावडे, महिला बालकल्याणचे बाळू साळवे आदी सहभागी झाले होते.
अहमदनगर चाईल्डलाईनने बाल कामगार या अनिष्ट प्रथेबद्दल कामगार कार्यालयास पत्र दिले होते. त्यानुसार दि.11 रोजी सकाळी धाडसत्राचे आयोजन करण्यात आले होते. या पथकाने माळीवाडा वेशीसमोर नवनाथ टी सेंटर येथे भेट दिली.
त्यावेळी नवनाथ टी सेंटरचे मालक रमेश पोपट चौधरी (वय 54 वर्षे, रा. विशाल गणपती मंदिराचे जवळ माळीवाडा अहमदनगर) यांच्या टी सेंटरवर एक 11 वर्षाचा मुलगा काम करीत होता. हा कामगार बाल कामगार असून त्यास कामाला ठेवले म्हणून रमेश चौधरी यांच्याविरुध्द गुन्ह्याची नोंद केली आहे.
----------
💥१०५ गुन्ह्यात ९५ आरोपींना अटक करत १६ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
💥नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले
💥कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या “पूर्णशुल्क माफी” निर्णयाची अंमलबजावणी करावी : चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
