हॉटेल व्यावसायिकास मारहाण करून लुटले
। अहमदनगर । दि.23 ऑक्टोबर । हॉटेलसाठी लागणारा भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या हॉटेल व्यावसायिकास एकाने शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व त्याच्याकडील अकरा हजार रुपये बळजबरीने चोरून नेले. ही घटना नालेगाव येथील डांगे गल्लीतील मारुती मंदिराजवळील भाजी मार्केट येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की विजय ईश्वरा वाळके (वय 32 वर्षे, रा. बाबुर्डी बेंद, ता. नगर) यांचे नगर-दौंड रोडवर हिवरे झरे शिवारामध्ये हॉटेल विजयराज नावाचे हॉटेल आहे. दि.21 रोजी रात्री नालेगावातील टांगेगल्ली भाजी मार्केट येथे हॉटेल व्यवसायासाठी लागणारा भाजीपाला खरेदी करुन निघाले असता तेथे त्यांच्या ओळखीचा बंडू भीमराज साळवे आला
व काहीएक कारण नसताना शिवीगाळ करु लागला व वाळके यांना लाथाबुक्क्याने मारहाण करुन त्यांच्या शर्टच्या खिशामध्ये ठेवलेले 11 हजार रुपये काढून घेवुन तो निघून गेला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी विजय ईश्वर वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बंडू साळवे याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दुर्गे करीत आहेत.
Tags:
Ahmednagar