बुधवारी बळी महोत्सव ; समिती अध्यक्षपदी संजय झिंजे

। अहमदनगर । दि.24 ऑक्टोबर । पुरोगामी परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने बळीराजाची स्मृती आणि सम्राट एकलव्य जयंतीनिमित्त बलिप्रतिपदेला (बुधवार, दि.26) प्रबोधनयात्रा आयोजित करण्यात आली आहे.

रेसिडेन्शिअल हायस्कूलसमोरील छत्रपती चौथे शिवाजी महाराज समाधी स्मारकास अभिवादन करून माळीवाडा येथील महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारकाजवळ व्याख्यान होऊन प्रबोधनयात्रा विसर्जित केली जाते.

यंदा बळीमहोत्सव समितीच्या अध्यक्षपदी हॉकर्स संघटनाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, सचिवपदी औषध विक्रते संघटनेचे सिध्देेशर कांबळे,खजिनदारपदी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सहसचिव फिरोज शेख यांची निवड करण्यात आली.

कॉ. भैरवनाथ वाकळे यांनी सांगितले की, दिवाळी हा सण मुख्यत्वे कृषीसंस्कृतीचा मुख्य भाग आहे. शेती म्हणजे कृषीसंस्कृतीचा शोध स्त्रीयांनी लावला. तिला व भूमिला नंतर संपत्ती मानले गेले. 

कृषी व स्त्री याच आपल्या लक्ष्मी असून त्यांचेच पुजन म्हणजे लक्ष्मीपूजन. महात्मा जोतीराव फुले यांनी पुणे शहरात बळीराजाची स्मृती म्हणून झेंड्याची मिरवणूक सुरू केली. पुढे बळीमहोत्सव म्हणून पुण्यात सुरू केली गेली.

महाराष्ट्रात अनेक शहरांत बलिप्रतिपदेला बळीमहोत्सवाचे आयोजन केले जाते. बैठकीस प्रा. डॉ. महेबुब सय्यद, चंद्रकांत माळी, अभिजित वाघ, असिफखान दुलेखान, दलजितसिंग वधवा, संध्या मेढे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post