मंत्रिमंडळ निर्णय : जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५०


। मुंबई । दि.03 ऑगस्ट । जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सध्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी ५५ आणि जास्तीत जास्त ८५ अशी सदस्य संख्या अशी आहे. ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे सुधारित सदस्य संख्या करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.  राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान ५० जागा देण्यात येतील.  या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल.

---------------

👉 सरकार असंवेदनशील! : अजित पवारांचे टीकास्त्र

👉 गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

👉 जिल्हा परिषद गटांवर फेरआरक्षणाचे सावट ; निवडणूक आयोग करणार मार्गदर्शन

Post a Comment

Previous Post Next Post