फडणवीस पक्ष श्रेष्ठींच्या भेटीसाठी...

। मुंबई । दि.04 ऑगस्ट ।  महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.  त्यानंतर फडणवीस पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी तातडीने रवाना झाले आहेत. यासाठी त्यांनी आजच्या आपल्या सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.  

👉 मंत्रिमंडळ निर्णय : जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५०

राज्यातील राजकीय पेचप्रसंगावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. यावर दोन्ही बाजूंकडून युक्तीवाद झाला. यावेळी न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलत येत्या ८ ऑगस्टला घेण्याचे निश्चित केले. 

👉 सरकार असंवेदनशील! : अजित पवारांचे टीकास्त्र

दरम्यान, शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाच्या प्रकरणावर निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय देऊ नये, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. सततच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या सर्व प्रशासकीय बैठका आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत. 

👉 गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करा : मुख्यमंत्री

Post a Comment

Previous Post Next Post