। मुंबई । दि.04 ऑगस्ट 2022 । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना आठ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
👉 फडणवीस पक्ष श्रेष्ठींच्या भेटीसाठी...
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए कोर्टात हजर केलं असता त्यांना चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. चार आॅगस्ट ही कोठडी संपल्याने राऊत यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
👉 मंत्रिमंडळ निर्णय : जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५०
अखेर न्यायालयाने त्यांची कोठडी वाढवली. संजय राऊत चौकशीत सहकार्य करत नाहीत, असा आरोप ईडीने न्यायालयात केला. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली होती.
👉 सरकार असंवेदनशील! : अजित पवारांचे टीकास्त्र
पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलंय, आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा सवालही उपस्थित केला होता. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली.
👉 गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करा : मुख्यमंत्री
त्यानंतर ईडीने आज पुन्हा एकदा कोठडी 10 ऑगस्टपर्यंत वाढवून मागितली. परंतु संजय राऊत यांचे वकील अॅड. मनोज मोहिते जिरह यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. परंतु कोर्टाने त्यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.
👉 मराठा भुषण चंद्रकांत लबडे यांच्या कार्यालयास पंजाबराव डख यांची भेट
