गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या तीन जणांच्या टोळीला अटक

गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या तीन जणांच्या टोळीला अटक

10 जिवंत काडतुसेही जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

। अहमदनगर । दि.19 जुन ।  परदेशी रिव्हॉल्व्हरसारखे दिसणारे 8 कट्टे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने श्रीरामपूर बसस्थानकाजवळील राधिका हॉटेलजवळ पकडले आहेत. 10 जिवंत काडतुसांसह जप्त करण्यात आलेल्या या कट्टे व काडतुसांची किंमत 2 लाख 45 हजार रुपये आहे. 

परराज्यातील हे कट्टे आले असून,ते कोठून आणले व कोणाला द्यायचे होते, याचा शोध पोलिसांनी सुरू केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीरामपूर शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदशीररित्या 8 गावठी कट्टे व 10 जिवंत काडतुसे बाळगणार्या तीन आरोपींची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

 राहुलसिंग फत्तुसिंग कलानी (वय 25), आकाशसिंग बादलसिंग जुनी (वय 22) व अक्षयसिंग तिलकसिंग कलानी (वय 22, सर्व रा. श्रीरामपूर बाजारतळ, गुरुगोविंदसिंग नगर, वॉर्ड नं. 3, श्रीरामपूर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून 2 लाख 45 हजारांचा कट्टे व काडतुसे मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजेंद्र देवमन वाघ यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या वर्षात 39 कट्टे जप्त : पोलिसांनी जानेवारी 2022पासून आतापर्यंत 39 कट्टे जप्त केले आहेत. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमधून हे कट्टे येथे येतात. जिल्ह्यातील दरोडे, मारामार्या व खुनांच्या गुन्ह्यात असे कट्टे वापरल्याचे निष्पन्नही झाले आहे. मध्य प्रदेशातील उमरकी येथून या कट्ट्यांचा पुरवठा होत असल्याचा संशय आहे. पण तेथील गुन्हेगार कट्टे घेणाराला तेथे बोलावतात व गावात प्रवेश करण्यासाठीच्या पुलावरच त्याच्याशी सौदा करून त्याला कट्टे देतात व नंतर त्याच्याशी बोलण्यासाठी वापरलेल्या मोबाईलचे सीमकार्ड तोडून टाकतात. त्यामुळे पुन्हा त्यांच्याशी कट्टे घेणारांचाही संपर्क होत नाही. त्यामुळे असे कट्टे तयार करून जिल्ह्यातील गुन्हेगारांना देणारांचा शोध विशेष मोहिमेद्वारे सुरू करण्यात आला आहे व त्यात काहीअंशी यशही येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

----------------

👉 लिफ्टच्या बहाण्याने मायलेकींना लुटले 

👉  कुटुंबीयांना मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा

 👉 एमआयडीसी परिसरातील सराईत भाकरे टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

Post a Comment

Previous Post Next Post