। मुंबई । दि.19 जुन 2022 । विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून वेगवान राजकीय हालचाली होत असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व आमदारांना मार्गदर्शन आणि मतदानाबाबत च्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवार मुंबईत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार हॉटेल ट्रायडंट येथे झालेल्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत या सर्व आमदारांना पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले. तसेच या सभेला राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या 22 उमेदवारांची महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी हॉटेलचा पर्याय निवडला आहे. या आमदारांवर लाखो रुपये खर्च केले जात असले, तरीही मत फुटण्याची भीती कायम आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
----------------
👉 पारनेरमध्ये १ कोटी २१ लाख ५० हजार रूपयांचा विदेशी मद्याचा साठा जप्त
👉 लिफ्टच्या बहाण्याने मायलेकींना लुटले
👉इलेक्ट्रिक वाहने वर्षात पेट्रोल गाड्यांच्या किमतीत मिळतील : मंत्री नितीन गडकरी यांचे मत