। अहमदनगर । दि.14 जुन । संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या भाकरे टोळी विरुध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी मंजुरी दिली आहे.
टोळी प्रमुख प्रेम नरेंद्र भाकरे (वय १९), टोळी सदस्य कुबड्या ऊर्फ किरण दशरथ पालवे, ढाच्या ऊर्फ नाविन्य संजय भाकरे (वय १८), आशिष अशोक भाकरे (वय २५), घाऱ्या ऊर्फ अभिषेक अरविंद भिंगारदिवे, गणेश काळे, संतोष धोत्रे (सर्व रा. नवनागापूर) अशी गुन्हेगारांची नावे आहेत.
या गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक अजित पाटील करीत आहेत.तरूणाला फोन करून बोलवून घेत चाकूने वार करत व बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. अल्ताफ बागवान (वय २५ रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा भाकरे टोळीने केल्याचे समोर आले होते. भाकरे टोळीविरूध्द मोक्का साठी सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी प्रस्ताव पाठवला होता. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी हा प्रस्ताव विशेष महानिरीक्षक डॉ. शेखर यांच्याकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे.
---------------
पारनेरमध्ये मोबाईल हिसकावणारे दोघे गजाआड ; ‘एलसीबी’ची कारवाई
नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मिडियावर पोस्ट टाकल्याने गुन्हा दाखल