सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची बैठक संपन्न

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची बैठक संपन्न

बैठकीत विविध विषयांवर चर्चा


 
। अहमदनगर । दि.19 जुन । सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संस्था, अहमदनगर यांची नुकतीच बैठक पोलीस अधिक्षक कार्यालयात नुकतीच संपन्न झाली.

जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना सेवानिवृत्ती नंतर आलेल्या विविध प्रकारच्या अडचणी बाबत या वेळी चर्चा करण्यात आली आहे.

तसेच अडचणीबाबत चर्चा करुन यावरील उपाय योजना कशा प्रकारे करता येईल या संदर्भात पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी  यावेळी सदस्यांना मार्गदर्शन केले आहे. 


यावेळी पोलिसांची मुले - मुली यांना स्कील डेव्हलपमेंट कोर्स व नोकरी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. पोलीसांच्या मुला - मुलींसाठी, हाउस कीपिंग, इलेक्ट्रिक,  प्लंबिंग, जनरल फायर, वेल्डिंग, सीएनजी मशीन ऑपरेटर, नर्सेस, फोर व्हीलर (चार चाकी)  टू व्हीलर मेकेनिकाल वगैरे कोर्सेस असून त्यासाठी डमिशन (प्रवेश), भोजन व रहाण्याची सोय विनामुल्य करण्यात येणार असल्याची माहिती अशी माहिती संस्थेचे जिल्हा अध्यक्ष नाथा घुले यांनी दिली.

यावेळी बैठकीला पोलिस अधिकारी दिलिपसिंग परदेशी, संजय भोंडवे, गोरक्षनाथ साबदे, शाम गायकवाड, यांच्यासह जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे जिल्हाध्यक्ष नाथा घुले, दिलिपसिंग परदेशी यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांचा सत्कार करुन उपस्थितांचे आभार मानले.

---------------

👉 बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

👉मुंबई पोलिसांचा संडे स्ट्रीट उपक्रम कौतुकास्पद : गृहमंत्री

👉 महाराष्ट्राला ऊर्जाक्षेत्रासाठी ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार’ प्रदान

👉 गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या तीन जणांच्या टोळीला अटक

Post a Comment

Previous Post Next Post