डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन च्या इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रूरल डेव्हलपमेंट मध्ये अधिष्ठाता संवाद संपन्न

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन च्या इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रूरल डेव्हलपमेंट मध्ये अधिष्ठाता संवाद संपन्न 

। अहमदनगर । दि.19 जुन ।  दि.18 जून 2022 रोजी आयबीएमआरडी विळद घाट अहमदनगर येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर पराग काळकर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील प्राध्यापकांबरोबर संवाद साधला .

सदर प्रसंगी डॉक्टर पराग काळकर यांनी वाणिज्य व व्यवस्थापन शाखे पुढील आव्हाने, देशातील नवीन शिक्षण धोरण ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नवनवीन उपक्रम, विद्यार्थी हिताचे निर्णय या सर्व विषयाचा उहापोह करून शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल कसा घडवता येईल या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन उपस्थितांना केले.  

सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच संस्थेचे तांत्रिक संचालक डॉ पीएम गायकवाड व उपसंचालक डॉ अभिजीत दिवटे सर यांनी मार्गदर्शन केले .

सदर संवाद कार्यक्रमात जिल्ह्यातील वाणिज्य व व्यवस्थापन महाविद्यालयातील प्राचार्य विभाग प्रमुख तसेच प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उस्फुर्त सहभाग नोंदविला सदर प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालय व आय बी एम आर डी यांचे सामंजस्य करारानुसार आय बी एम आर डी च्या प्राध्यापकांना अभ्यास मंडळ सदस्य म्हणून नेमणूक पत्र सुद्धा माननीय अधिष्ठाता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

उपस्थितांनी सदर कार्यक्रमाचे अत्यंत कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉक्टर भास्कर झावरे न्यू आर्ट्स कॉलेज अहमदनगर यांनी आय बी एम आर डी च्या उपक्रमशील त्याचे कौतुक करून असा अधिष्ठाता संवाद नेहमी आयोजित केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमांमध्ये न्यू आर्ट्स कॉलेज अहमदनगर, कॉलेज राधाबाई काळे महिला महाविद्यालय,केजी मुनोत कॉलेज, परिक्रमा एमबीए कॉलेज काष्टी, साईकृपा एमबीए कॉलेज घारगाव, समर्थ एमबीए कॉलेज बेल्हा, संजीवनी कॉलेज कोपरगाव, अमृतवाहिनी कॉलेज संगमनेर, अडसूळ कॉलेज, आय एम एस सी डी आर अहमदनगर, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे एम बी कॉलेज अकोले इत्यादी महाविद्यालयांमधून प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राजेन्द्रसिंह परदेशी व आभार प्रदर्शन डॉक्टर मेघा जैन यांनी केले.

------------------

👉 मुंबई पोलिसांचा संडे स्ट्रीट उपक्रम कौतुकास्पद : गृहमंत्री 

👉 बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

👉  सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची बैठक संपन्न

👉  रेसिडेन्शिअल हायस्कूलचा 95.99 टक्के निकाल

Post a Comment

Previous Post Next Post