। पुणे । दि.12 मे । छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केले. या पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजे काय भूमिका मांडतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.
आज छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये पहिली घोषणा राज्यसभे संदर्भात असून दुसरी घोषणा आहे ती नवीन स्वराज्य संघटने विषयी आहे.
यावेळी बोलताना राजे म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी नव्हे, तर लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय. यासोबत त्यांनी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार असल्याचंही जाहीर केल आहे.
स्वराज्य संघटीत करत असताना आपण ज्यापद्धतीने प्रेम दिलं, ताकद दिली.ही संघटना, स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी काही वावगं समजू नये आाणि माझी त्याला तयारी सुद्धा आहे.
Tags:
Breaking