झारखंडमध्ये आयएएस अधिकारी पूजा सिंघलला ईडीकडून अटक
। रांची । झारखंड । दि.11 मे 2022 । दोन दिवसांच्या चौकशीनंतर अखेर कोट्यवधी रुपयांच्या मनरेगा घोटाळ्याप्रकरणी आयएएस अधिकारी पूजा सिंघलला अटक करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी त्यांना ईडीने अधिकृतपणे अटक केली.
ईडीने तपासात पूजा सिंघल आणि तिचा पती अभिषेक झा यांना प्रथमदर्शनी मनी लाँड्रिंगप्रकरणी दोषी ठरवले आहे. पूजा सिंघलच्या पतीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. येथे न्यायालयाने आयएएस पूजा सिंघलला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
सध्या त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. त्याचवेळी झारखंड सरकारने आयएएस पूजा सिंघल यांना निलंबित केले आहे.
कडेकोट बंदोबस्तात कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टात हजेरी लावताना ईडीने पूजा सिंघलला सात दिवसांची कोठडी मागितली. मात्र, कोर्टाने केवळ पाच दिवसांची कोठडी मंजूर केली.आता ईडी पूजा सिंघलची पुढील पाच दिवस चौकशी करू शकते.
---------------
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी ५ जूनला मतदान
Tags:
Breaking