पठारी भागात पाणी आणण्यासाठी जगन्नाथ भोर यांना मदत करणार...


। अहमदनगर । दि.12 मे 2022।  नगर व पारनेर भागातील पठार भागात शेतीसाठी पाणी आणण्यासाठी जगन्नाथ भोर प्रयत्न करित आहेत. त्यासाठी पिंपळगाव कौडाचे ग्रामस्थ सर्वप्रकारची मदत व सहकार्य करणार असल्याचे सरपंच सतीश प्रकाश ढवळे यांनी केले.

पिंपळगाव कौडा येथे आज ग्रामस्थांबरोबर भोर यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी श्री सहादू पवार, बन्सी कोल्हे, भरत आण्णा गवळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगन्नाथ भोर म्हणाले की, साकाळाई उपसा जलसिंचन योजना लवकरच मार्गी लागणार आहे. शहाजापूर उपसा जलसिंचन योजना सुद्धा मार्गी लागणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ही योजना झाल्यास आपल्या भागातील टॅकर, जनावरांच्या छावण्या कायमच्या हद्दपार होतील. या भागाचे नंदनवन होईल अशी अपेक्षा ग्रामस्थानी व्यक्त केली. त्यामुळे ग्रामस्थांनी यासाठी लवकरच कृती समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले. 

----------------

छत्रपती संभाजीराजे यांनी घेतले दोन निर्णय

आयएएस अधिकारी ईडीकडून अटक 

मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात ... 

Post a Comment

Previous Post Next Post