। अहमदनगर । दि.08 मे 2022। पालघर जिल्हा टग ऑफ वॉर (रस्सीखेच) असोसिएशन व महाराष्ट्र राज्य टग ऑफ वॉर असोसिएशनच्या विद्यमाने २३ वी सिनिअर मुले-मुली राज्यस्तरीय टग ऑफ वॉर अजिंक्यपद स्पर्धा १८ व १९ मे रोजी डहाणू (पालघर) येथे आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा संघ निवडीसाठी बुधवारी ११ मे रोजी सकाळी ११ वाजता येथील डॉ. देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील इच्छुक खेळाडू व संघांनी या निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी प्रा नंदलाल काळण, राजेंद्र थोरात, अशोक निकाळे, सुनील मंडलिक (८२७५२८१०५७) या नंबरवर संपर्क करावा.
----------------
खदानीत बुडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
माळेगाव मधील विकासकामे चांगल्या दर्जाची करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
Tags:
Ahmednagar