। मुंबई । दि.15 मे 2022 । राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.मुंबई - मराठी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिका केल्या प्रकरणी केतकी चितळे हिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिला कोर्टात हजार करण्यात आले होते त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी केतकी चितळे हिने स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला.
केतकीने कोर्टात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिनं केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असंही तिनं कोर्टासमोर म्हटलं.
---------------
'केतकीला चोप देणारच : रुपाली पाटील-ठोंबरे
गर्भपात गोळ्यांशी संबंधित श्रीराम एजन्सी परवाना रद्द
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या बिजोत्पादन प्रकल्पास देशात प्रथम क्रमांक