। पुणे । दि.14 मे । अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्यानंतर तिच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. याप्रकरणी केतकी विरोधात मुंबईमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
परंतु, केतकीने हा जो काही खोडसाळ पणा केला आहे. तिला तिच्याच भाषेत, तिच्याच संस्कारात चांगला चोप देण्यात येणार आहे. पहिली गोष्ट शरद पवार यांच्याबद्दल बोलण्याची तिची पात्रता नाही. ती जे काही बोललेही आहे, तिला कोणाताही अर्थ नाही.
मात्र, त्यामुळे आमच्या सारख्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याच्याबद्दल तिला चांगल्या चार पाच चापटी मिळाल्या ना, ती तिच्या आजारातून लवकर बरी होईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
Tags:
Maharashtra