। अहमदनगर । दि.16 मे 2022। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा सोमवारी, १६ मे ला वैशाख पौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
पौर्णिमेला सकाळी ६ वाजता श्रीखंडोबा मंगलस्नान, अभिषेक, पूजा होऊन सकाळी ७ वाजता महाआरती होईल. सकाळी ९ वाजता देवाची पालखीतून प्रदक्षिणा मिरवणूक सवाद्य निघेल. भाविक भक्ताचे पालखी दर्शन व ओलांडा दर्शन, लंगर तोडणे, नैवैद्य हे धार्मिक विधी होऊन पालखी ११ वाजता मंदिरात परत आगमन होईल.
दुपारी ११ वाजल्यापासून पौर्णिमेचा महाप्रसाद वाटप भाविक भक्तांतर्फे होईल. मंदिर परिसर पर्यटन विकास योजने अंतर्गत सुशोभीकरण चालू असून भाविक भक्ताना सुविधा मिळत आहेत, सध्या लग्नसराई सुरू असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे. देवस्थानतर्फे पौर्णिमा उत्सवात दर्शन व्यवस्था, वाहने पार्किंग, पिण्याचे पाणी नियोजन आहे.
सर्व भाविक भक्तानी उत्सव पर्वणी व देवदर्शन पालखी सोहळा, महाप्रसाद व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे अॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेंद्र नरड, चिटणीस मनीषा जगदाळे, खजिनदार हनुमंत सुपेकर, विश्वस्त किसन मुंढे, अश्विनी थोरात, चंद्रभान ठुबे, मोहन घनदाट, अमर गुंजाळ, किसन धुमाळ, बन्सी ढोमे, दिलीप घोडके, साहिबा गुंजाळ, देविदास क्षीरसागर सर्व आजी-माजी विश्वस्त यांनी केले.