। केदारनाथ । दि.06 मे 2022 । बाबा केदारनाथचे दरवाजे आज सकाळी 7:30 वाजता सर्वसामान्य भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. दरवाजे उघडण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पुष्कर धामीही उपस्थित होते.
केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पहिली पूजा करण्यात आलीभक्त आतुरतेने बाबांचे दरवाजे उघडण्याची वाट पाहत होते. केदारनाथ धामचे दरवाजे उघडताच भाविकांची सहा महिन्यांची प्रतीक्षा संपली.
दरम्यान, हर हर महादेवच्या जयघोषाने धाम दुमदुमून गेला आहे. ६ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज बाबा केदार यांच्या भक्तांची इच्छा पूर्ण झाली आहे. सकाळी 7:30 वाजता बाबा केदारचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत.
आज सकाळी केदारनाथच्या मुख्य पुजाऱ्याच्या घरातून बाबा केदार यांची डोली लष्करी बँड आणि स्थानिक वाद्यांसह मंदिर परिसरात आणण्यात आली. त्यानंतर जय बाबा केदारच्या घोषणांनी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.
---------------
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्याताई चव्हाण यांची नियुक्ती
क्रिकेट खेळताना वाद, दोन गटात हाणामारी
हर्षदाच्या ‘सुवर्ण’ कामगिरीचा देशाला अभिमान : उपमुख्यमंत्री अजित पवार