। अहमदनगर । दि.05 मे । रामवाडी परिसरात क्रिकेट खेळताना झालेल्या मुलांच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी हाणामारी करणारे आरोपी पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस नाईक तनवीर सलीम शेख यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख व कॉन्स्टेबल संतोष मगर हे तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना रामवाडी परिसरात दोन गटात हाणामारी सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस येताच आरोपींनी तेथून पळ काढला. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून ही हाणामारी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी सोहेल आसिफ सय्यद, फरदीन आसिफ सय्यद, तौफिक शेख, जिशान सत्तार शेख, हुसेन शाकीर सय्यद, आशरफ जाकीर शेख यांच्यासह 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags:
Ahmednagar