। अहमदनगर । दि.05 मे 2022 । नगर शहरातील ढवण वस्ती परिसरात वास्तव्यास असलेल्या दारुड्याला अज्ञात आरोपीने लुटल्याची घटना घडली आहे. आरोपीने दुचाकीसह पाच हजार रुपयांची रोकड चोरुन नेली आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख मल्हारी खताळ (वय 56) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. खताळ यांना दारूचे व्यसन असल्याने ते शहरातील भिस्तबाग चौकात दारू पीत असताना 31 वर्षीय व्यक्तीसोबत त्यांची ओळख झाली.
खताळ यांना आरोपीने दारू पाजली आणि घरी सोडण्याचा बहाणा करून खताळ यांच्याकडे असलेली त्यांच्या मेहुण्याची दुचाकी आणि पाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. खताळ यांची दारूची नशा उतरल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.
त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
----------------
सहा महिन्यांनंतर उघडले केदारनाथ मंदिराचे दरवाजे
हर्षदाच्या ‘सुवर्ण’ कामगिरीचा देशाला अभिमान : उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्याताई चव्हाण यांची नियुक्ती
Tags:
Ahmednagar