आय ए पवार यांच्या कविताराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी



। अहमदनगर । जामखेड । दि.04 मे 2022। जामखेड येथील साहित्यिक प्रा. आ. य. पवार यांच्या विज्ञान आणि निसर्ग कवितांवर गुरुवारी, ५ मे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन लातूर येथील व्यंकटराव देशमुख महाविद्यालय व स्वा. रा. ती. विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य राम वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० ते ३ या वेळेत करण्यात आले आहे. 

चर्चा सत्र तीन सत्रात होणार आहे. वाराणसी विद्यापीठाचे ( उत्तर प्रदेश) मराठी विभाग प्रमुख व प्रसिद्ध समीक्षक डॉ. प्रमोद पडवळ सत्राचे उद्घाटन करणार आहेत. प्रसिद्ध लेखिका व विज्ञान साहित्याच्या अभ्यासक आणि अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ मोना चिमोटे चर्चासत्राचे बीजभाषण करणार आहेत. 

गोवा विद्यापीठाचे डॉ.चिन्मय घैसास, नांदेड विद्यापीठाचे डॉ प‌थ्वीराज तौर आदींसह राज्यातील विविध महाविद्यालयातील नामवंत समीक्षक, अभ्यासक या आभासी चर्चा सत्रात सहभागी होतील. जामखेड येथील पवार यांच्या कविता विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमात अाहेत. 

त्यांच्या कवितेवर तीन समीक्षा ग्रंथ संपादकांनी संपादित केले आहेत. कवी पवार यांनी नव्वदोत्तरी मराठी कवितेत दुर्मिळ विज्ञान कवितेचा प्रवाह समृद्ध केला आहे. शेत शिवार व बांधावरील निसर्ग रुपाची चित्रणे वेगळ्या शब्दशिल्पात रेखाटली असल्याने ही निसर्ग कविता समीक्षकांना प्रयोगशिल वळणाची व स्वतंत्र वाटते.

Post a Comment

Previous Post Next Post