। अहिल्यानगर । दि.29 डिसेंबर 2025 । महानगरपालिकेची निवडणुक 15 जानेवारी रोजी होत असून उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. याचत आज मोठी घडामोडी पहावयास मिळाल्या आहेत. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षित जागा सोडण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर, अनिल शिंदे, सचिन जाधव, संभाजी कदम, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे आदींनी हा निर्णय जाहीर करत सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख होती. शिवसनेने तब्बल 24 जागा मिळवल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत जागा वाटपात त्यांना योग्य न्याय न दिल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेवून वेगळा निर्णय जाहिर केला आहे.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर, अनिल शिंदे, संभाजी कदम, गणेश शिंदे, बाळासाहेब बोराटे, प्रशांत गायकवाड, अॅड.स्वाती जाधव, अशोक दहिफळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
