। अहमदनगर । दि.04 मे । अहमदनगर पोस्टल डिव्हीजन को ऑप क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षपदी निसार शेख तर उपाध्यक्षपदी रामेश्वर ढाकणे यांची बिनविरोध निवड.
पोस्ट खात्याची सर्वात जुनी 1920 साली स्थापन झालेल्या अहमदनगर पोस्टल डिव्हीजन को ऑप क्रेडीट सोसायटीची सन 2022 ते 2027 या कालावधीकरीता संचालक मंडळ निवडणुक नुुकतीच बिनविरोध पार पडली आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा निवडणुक निर्णय अधिकारी व्ही.के.मुटकुळे यांंच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यासभेत अध्यक्षपदासाठी निसार शेख यांच्या नावांची सुचना प्रमोद कदम यांनी मांडली. त्यास प्रफुल्लकुमार काळे यांनी अनुमोदन दिले.
तर उपाध्यक्षपदासाठी रामेश्वर ढाकणे यांच्या नावाची सुचना सलीम शेख यांनी मांडली तर किशोर नेमाणे यांनी त्यास अनुमोदन दिले. अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी नुतन संचालक प्रफुल्लकुमार काळे, प्रमोद कदम, महेश तामटे, किशोर नेमाणे, सलीम शेख, सुनील कुलकर्णी, शिवाजी कांबळे, अर्चना दहिंडे, स्वप्ना चिलवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षाचे संस्थेचे माजी अध्यक्ष अनिल गांधी, दत्तात्रय जासूद ,अमीत कोरडे, सुनील भागवत, बळी जायभाय, दिलीप खरात, मिलींद भोंगले, विजय कोल्हे, सुनील चांडोले, प्रशांत पवार,
सचिन कल्हापुरे, भाऊसाहेब शिंदे, आनंद भोंडवे, दिपक जसवाणी, देवेंद्र शिंदे, बलराम दाते, सोै. अनुराधा मंचरकर, सौ, स्मिता कुलांगे, सौ, शुंभांगी मांडगे, सौ. पल्लवी मळेकर, सौ. अर्चना गोसके, सौ. नमिता देशपांडे श्रीमती उर्मिला आडोळे, सचिन अस्वर, सुनिल धस, गणेश केसकर,
सचिन देवकाते, महेश दांगट, जगदीश पेलेवाड, रमजान पठाण, धनंजय दैठणकर, इरफान पठाण, प्रताप कारखिले, सुभाष चव्हाण, आनंद कात्राकर, संतोष झावरे, गोरक्ष आचार्य, सतीश गायकवाड, सुधाकर कुलकर्णी, अंबादास सुद्रीक, बाबासाहेब बुट्टे, राजू कोल्हे, कैलास भुजबळ, राहुल गर्कळ, महेश क्षीरसागर, विशाल म्हस्के, शिवाजी विखे, वेदशास्त्री वाकळे, जय मडावी, अर्जुन जटाले, जावेद शेख आदींनी अभिनंदन केले आहे.