...तोपर्यंत हनुमान चालीसा चालूच राहणार : राज ठाकरे

 

। मुंबई । दि.04 मे 2022।  हनुमान चालीसाचे आंदोलन हे एका दिवसाचे नाही. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले जात नाही, तोपर्यंत मनसे मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवत राहतील, असा पवित्रा राज ठाकरे यांनी घेतला आहे. आज सकाळपासून मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला. 

याबद्दल राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात 90 ते 92 टक्के ठिकाणी सकाळची अजान झालेली नाही. त्या मशिदीतील मुल्ला-मौलवींचे मी आभार मानतो. तर इतर 135 मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर अजान झाली. त्या मशिदींवर कारवाई केव्हा करणार, असा सवाल त्यांनी केला.

जेव्हा निवेदनाची भाषा समजत नाही, तेव्हा आंदोलनाची भाषा सुरु होते. त्यामुळे जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले जात नाही तोपर्यंत हनुमान चालिसाचे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

---------------

खोटे बोलून राज ठाकरेंनी इतिहासाचा खून केला : श्रीमंत कोकाटे

चित्रकलेतून कल्पकता निर्माण होते: ॲड धनंजय जाधव 

महावितरणची डिजीटलायजेशनकडे वाटचाल ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्यांचे वाढले प्रमाण

Post a Comment

Previous Post Next Post