। मुंबई । दि.10 मे 2022 । टॉयलेट प्रकरणाच्या घोटाळ्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची तक्रार केली आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी मुलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यात कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत तक्रार नोंदविली आहे.
यावेळी संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांनी द्यावेत, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. तक्रार दाखल केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, गेली 40 वर्षे मेधा सोमय्या या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्याविरोधात संजय राऊत यांनी बेछूट आरोप केले आहेत. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेनी नौटंकी बंद करून गुन्हा नोंदविण्याचे तात्काळ आदेश द्यावेत, असे आव्हानही दिले. दरम्यान, आज सकाळी शिसेनेचे खासदार संजय त यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला.
------------------
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर घेण्याबाबत…
पतसंस्था मधील ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत प्रयत्न करु : उपमुख्यमंत्री अजित पवार