। मुंबई । दि.09 मे 2022। पोलीस ठाणे, तुरुंगात आमच्याशी गैरव्यवहार झाला आहे. याबाबतची सर्व माहिती दिल्लीत जाऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देणार असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आज दिल्लाला रवाना झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारविरोधात राणा दाम्पत्य दिल्लीत दरबारी तक्रार करणार आहेत.
खासदार नवनीत राणा मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारची तक्रार करण्यासाठी राणा दाम्पत्य दिल्लीसाठी रवाना झाले आहे.
तर, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि मंत्री अनिल परब यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांची भेट घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत देखील सांगणार असल्याचे यावेळी राणा दाम्पत्याने सांगितले.