बोगस खते, बियाणे आढळल्यास कंपनी, दुकानदारांवर गुन्हे : भुसे

। नाशिक । दि.10 मे 2022 । हवामान विभागाने यंदा देशात ९९ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार कृषी विभागाने खरीप हंगामासाठी तयारी केली आहे. राज्यात कुठेही बोगस खते, वजनात कमी किंवा बियाण्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास संबंधित दुकानदारासह कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या. 

राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी अडवणूक करू नये. जे उद्दिष्ट दिले असेल ते पूर्ण करुन शेतकऱ्यांना हंगामापूर्वीच कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशाही सूचना भुसे यांनी केल्या. नाशिक विभागीय खरीप हंगामाची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सोमवारी झाली. 

नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून विभागाचे एकूण २५ लाख ६७ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र आहे.


खरीप हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते निविष्ठांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला पीक कर्ज देणाऱ्या बँकेसमवेत बैठक घेऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे भुसे म्हणाले.

--------------------

पतसंस्था मधील ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत प्रयत्न करु : उपमुख्यमंत्री अजित पवार 

संजय राऊतांविरोधात मेधा सोमय्यांची अब्रुनुकसानीची तक्रार दाखल 

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर घेण्याबाबत…

Post a Comment

Previous Post Next Post