काळ्याबाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला


 
। अहमदनगर । दि.08 मार्च ।जिल्ह्यातील रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जाणारा ट्रकच पोलिसांनी पकडला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पीरफाटा, रुईगव्हाण येथे रात्री 9च्या सुमारास पोलिसांनी श्रीगोंद्याकडे जाणारा 10 टायर ट्रक (क्रमांक एमएच 17 एक्यु 7373) पकडला. 
यात शासकीय रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी ट्रकमधून बनावट रजिस्टर नंबर टाकून शासनाच्या फसवणूक करुन घेवून जाताना मिळून आला. 

पोलिस कॉन्स्टेबल सुनील खरे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी ज्ञानेश्वर कल्याण काळे (रा. डोगरेश्वर पुनर्वसन, पाटस, ता. दौंड) व गणेश लालासाहेब निंबाळकर (रा. वरवंडी, ता. दौंड) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 420, 46534 तसेच

जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानेश्वर काळेला अटक करण्यात आली असून गणेश निंबाळकर हा पसार झाला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक मुंडे करीत आहेत.

हे देखील वाचा...एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधिमंडळाची संयुक्त समिती गठीत करणार

हे देखील वाचा...पिंपळगाव जोगाचे पाणी सोडा अन्यथा रस्त्यावर उतरु
 
 
 

Post a Comment

Previous Post Next Post