जिल्हा बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची कोपरगाव पीपल्स बँकेस भेट

। अहमदनगर । दि.08 मार्च । अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच महानगर बँकेचे अध्यक्ष उदय गुलाबराव शेळके यांनी कोपरगाव पीपल्स बँकेस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांची बँकेचे संचालक मंडळासमवेत त्यांनी चर्चा व एकूणच बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती घेतली.

कोपरगाव पीपल्स बँक ही अहमदनगर जिल्ह्यातील नावलौकिक प्राप्त संस्था असून या बँकेचे एकूण निधी, भांडवल पर्याप्तता तसेच एनपीए प्रमाण याबाबत समाधान व्यक्त केले. या बँकेचा असलेला सतत ऑडिट वर्ग अ व सभासदांना १५ टक्के लाभांश देणारी जिल्ह्यातील एकमेव बँक ही पीपल्स बँक असल्याचे नमूद केले. 

त्यांनी सहकार क्षेत्रातील बँकांवर येत असलेल्या अडचणी तसेच यातून मार्गक्रमण करीत संस्था सुस्थितीत चालवणे, रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष सांभाळून नफा क्षमता टिकवणे कठीण असतानाही पीपल्स बँकेने त्यांचा चढा आलेख कायम राखला, असे उद्गार काढले. यावेळी पीपल्स बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी सध्या ग्राहकांकरिता डिजिटल बँकिंगच्या दृष्टीने बँक लवकरच आपल्या ग्राहकांना मोबाइल बँकिंग सुविधा सुरू करीत असल्याची माहिती दिली. 

यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे, संचालक गणपतराव सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, संग्राम देशमुख, पीपल्स बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा, उपाध्यक्ष प्रतिभा शिलेदार, संचालक कैलासचंद ठोळे, सुनील कंगले, रवींद्र लोहाडे, कल्पेश शहा, सुनील बंब, वसंत आव्हाड, यशवंत आबनावे, जनरल मॅनेजर दीपक एकबोटे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post