। मुंंबई । दि.03 मार्च । आज महाराष्ट्राच्या विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी राज्यपाल आपले अभिभाषण करत असतात. त्यांच्या भाषणावर कामकाजाला सुरुवात होत असते. मात्र, राज्यपालांच्या या भाषणावेळी प्रचंड गदारोळ झालेला पहायला मिळाला आहे. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपले भाषण अर्ध्यावरच थांबवले आणि ते निघून गेले
आजपासून तीन आठवड्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 11 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन चालेल. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याऐवजी मुंबईत घेण्यात आले आहे.
विरोधकांनी यावरून धुरळा उडवला असला तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर घेण्याची आग्रही मागणीला फाटा देत आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील मुंबईत घेऊन विरोधकांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. विरोधक यामुळे आक्रमक झाले आहेत.
Tags:
Breaking