। कोल्हापूर । दि.03 मार्च । शेतजमिनीच्या वादातून शेतकर्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. हातकणंगले तालुक्यातील साजणी इथे ही घटना घडली.
मुनाफ सत्तारमेकर असे मृत शेतकर्याचे नाव आहे. तर संशयित आरोपी नितिन कोण्णुरे स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. बुधवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
हातकणंगले तालुक्यातील साजणी येथील संकाण्णा मळ्यातील शेतकरी नितिन कोण्णुरे यांनी फायनान्स कंपनीकडून शेती तारण ठेवून कर्ज घेतले होते.
मात्र, काही कारणाने त्यांच्याकडून कर्ज परतफेड करणे शक्य झाले नाही. त्यामुळे संबंधित फायनान्स कंपनीने नितिन कोण्णुरे यांची जमीन लिलावात कबनुर ही मुनाफ सत्तारमेकर यांना विकली होती. तेव्हापासूनच कोण्णुरे आणि सत्तारमेकर यांच्यात वाद सुरू होता.
Tags:
Crime