‘त्या’ सुटकेसमध्ये सापडल्या ‘या’ वस्तू


। अहमदनगर । दि.09 मार्च । नगर शहरातील नगर-पुणे रोडवरील अरुणोदय हॉस्पिटल समोरील एका चहाच्या दुकानावर एक बेवारस सुटकेस सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती तसेच या सुटकेसची बॉम्ब शोध पथकाने तपासणी केल्यानंतर काही सिग्नल मिळाल्याने चिंतेतभर पडली होती.



त्यामुळे खबदारी म्हणून बॉम्ब शोध पथकाने ही सुटकेस थेट अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या मुख्यालयाच्या मैदानावर नेऊन तिथे उघडण्याचे ठरवले सुटकेस मुख्यालयाच्या मैदानावर आणल्यानंतर सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर दोन्ही बाजूंनी दोरीच्या सहाय्याने ही सुटकेस उघडली.


मात्र या बॅगे मधून औषधे, एक मोबाईल,गाडीचे लोखंडी पाटे ,तसेच रोजच्या वापरण्यात येणाऱ्या साबण ,कोलगेट अशा वस्तू मिळून आल्या आहेत ही सुटकेस एका लष्करी कर्मचाऱ्याची असल्याचे माहिती मिळाली आहे. तीन तास चाललेल्या शोधा मुळे नगर शहरात अफवांचे पीक उठले होते मात्र या बॅगमधून काहीच निघाले नसल्याने पोलिसांनी निश्वास सोडला आहे.

😷 हे देखील वाचा...शेतपिकांच्या नुकसान भरपाईकरिता १२५ कोटी रूपयांचा निधी वितरित : मंत्री वडेट्टीवार यांची माहिती

😮 हे देखील वाचा...कट मारल्याच्या बहाण्याने दाम्पत्यास बेदम मारहाण 

😃 हे देखील वाचा...रस्त्यावर उतरू, तुम्हाला फिरणं मुश्कील करून टाकू : चंद्रकात पाटील 

Post a Comment

Previous Post Next Post