। मुंंबई । दि.09 मार्च । दाऊदशी संबंधित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करण्याचा आरोप असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली असल्याचे चित्र सध्या पाहिला मिळत आहे आहे.
आज मुंबई येथील आझाद मैदानावर भाजप समर्थकांनी विराट मोर्चा काढला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आदी भाजप नेत्यांची यावेळी उपस्थिती होती.
दाऊदच्या दबावाला बळी पडून हे सरकार नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाहीये. त्यांना पाठिशी घालत आहे. दाऊदला मदत करणार्यांच्या पाठिशी उभं राहण्याासठी सरकारची धडपड आहे. यांना शेतकर्यांची चिंता नाहीये.
वीजेची कनेक्शन कापली जात आहेत. पिकं जळून जात आहेत. परीक्षांचे पेपर हुकतायत. त्याचं नाही नाही. यांना मलिकांना वाचवायचंय, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भाषणात केला.
नवाब मलिका यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपचं हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा चंद्रकात पाटील यांनी दिला. ते म्हणाले, ‘यह तो एक अंगडाई हे आगे और लडाई है, महाराष्ट्राच्या गावा-गावात संघर्ष करू, रस्त्यावर उतरू.
तुम्हाला फिरणं मुश्कील करून टाकू. दाऊदशी तुमचं नाव जोडलं गेलंय. दाऊदला मदत करणार्यांच्या पाठिशी उभं राहण्याासठी सरकारची धडपड असल्याचाही आरोप आता केला जात आहे.