भारतीय बाजारातही सोन्या-चांदीचे दर वाढले


। मुंबई । दि.25 मार्च । जागतिक बाजारपेठेतील किंमतीत वाढ झाल्यामुळे शुक्रवारी भारतीय बाजारातही सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. मल्टीकमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दराने पुन्हा 52 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

MCX वर, 9.10 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 308 रुपयांनी वाढून 57,075 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. एक्सचेंजवर ट्रेडिंगच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 51,702 रुपयांवर उघडला होता. यानंतर वाढत्या मागणीमुळे पिवळ्या धातूचे भाव वाढतच गेले आणि काही मिनिटांतच 52 हजार रुपयांची पातळी ओलांडली.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,200 रुपये
पुणे – 48,300 रुपये
नागपूर – 48,250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,590 रुपये
पुणे – 52,690 रुपये
नागपूर – 52,640 रुपये

---------------------------------------------------------------------------------------------------------------

खालील बातम्या देखील वाचा...

दहा हजाराची लाच स्विकारताना पोलिस अंमलदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात...

अडीच लाखांचे गोमांस जप्त करत २५ वासरांची सुटका; तिघांवर गुन्हा 

इंधनवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन 

सुप्रिया सुळेंचा इंधन दरवाढीवरून मोदी सरकारला टोला 

Post a Comment

Previous Post Next Post