। अहमदनगर । दि.25 मार्च । रुग्णवाहिकेची सेवा हे काळाची गरज बनले आहेत. रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी मदत होत असते या धकाधकीच्या युगात मध्ये देशभरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये मृत्युदराचे प्रमाण ही वाढले आहे. यासाठी रुग्णाला तातडीची सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका काम करत असतात.
रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अनेक नागरिकांचे जीव वाचण्याचे काम होत असते. अशोक चौभे मित्र मंडळाच्या वतीने रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली आहे. ही सेवा समाजाला प्रेरणादायी ठरेल अशोक चौभे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सुरु केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आमदार अरुण काका जगताप यांनी केले.
आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक चौभे मित्र मंडळाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा शुभारंभ आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अशोक चौभे, माजी नगरसेवक सतीश बारस्कर, योगेश ठुबे, दादासाहेब पांडुळे, गणेश औटी, सागर नाईकवाडी, रवी आंबेकर,
संतोष भवार, पियुष लोढा, भरत मामा पवार, दगडू मामा पवार, सचिन तुंगार, शरद मोरे, अर्जुन दळवी, राजेश जाधव, बाबू शेख, बबलू नरवडे, भरत रेपाटे, संदीप सुरवसे, सुरज भागवत, बबन मोरे, शिवाजीराव डोके, राजेंद्र ऐकाडे, राजेश भंडारी, प्राध्यापक माणिकराव विधाते, ज्ञानदेव पांडुळे, आदी उपस्थित होते.
अशोक चौभे म्हणाले की नगर जामखेड रोडवर सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे अपघात झाल्यानंतर नागरिकांना वेळेवर उपचार मिळणे गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली आहे गरजूंना या रुग्णवाहिकेचा लाभ होणार आहे ग्रामीण भागातील तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी रुग्णवाहिकेची सेवा देत राहील मित्र परिवाराच्या माध्यमातून हे रुग्ण सेवा सुरू केली आहे असे ते म्हणाले
Tags:
Ahmednagar
