अडीच लाखांचे गोमांस जप्त करत २५ वासरांची सुटका; तिघांवर गुन्हा


। अहमदनगर -संगमनेर। दि.24 मार्च ।  तालुक्यातील समनापूर येथे पिकअपवर कारवाई करत अडीच लाख रुपयांचे गोमांस व वाहन जप्त करण्यात आले. तर कत्तलीसाठी मदिना नगरच्या म्हसोबा मंदिराच्या मागे काटवनात बांधून ठेवलेल्या २५ वासरांची सुटका गुरुवारी पोलिसांनी केली. या घटनेतील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

शहरातून पिकअप (एमएच १४ डीएम ८३७५) मध्ये कोपरगावला गोमांस घेऊन जात असल्याची माहिती उपअधीक्षक मदने यांना मिळताच त्यांनी पथकाला कारवाई करण्यास सांगितले. भुसा भरलेल्या पिकअपमध्ये गोमांस आढळून आले. 

तालुका पोलिसांनी चार लाखाच्या मुद्देमालासह मोसिन अन्वर कुरेशी (वय ३१), तौसिफ ताहिर कुरेशी (भारतनगर) या दोघांवर गुन्हा दाखल केला. तर मदिना नगर येथील म्हसोबा मंदिराच्या मागे छापा टाकत कत्तलीसाठी काटवनात बांधलेल्या २५ वासरांची सुटका शहर पोलिसांनी करत त्यांची रवानगी पांजरपोळमध्ये केली. तंजीमुल निसार कुरेशी (मदिनानगर) याच्यावर गुन्हा दाखल केला.

Post a Comment

Previous Post Next Post