। बीड । दि.25 मार्च । पोलिस अंमलदार याने गुन्हयात मतद करण्यासाठी दहा हाजार रुपयांची लाच मागितली आणि लगत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आडकला आहे. लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला यामध्ये पोलिस अंमलदार रंगेहात सापळ्यात अडकाला आहे. तेजस वाहुळे असे लाचखोर पोलीस नाईकचे नाव आहे.
बीड येथील धारुर ठाण्यात एका प्रकरणात दोन गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या होत्या. दोन्ही गटातील माणसांवर गुन्हे नोंद करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास तेजस वाहुळे यांच्याकडे होता.
दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी एका गटाकडे त्यांनी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामुळे या गटाने वाहुळेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. याबाबत एसीबीकडे तक्रार आल्यानंतर लाच मागणी पडताळणी करण्यात आली.
त्यानंतर मंगळवारी आडस येथील चौकीत एसीबीने सापळा लावला. सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान तक्रारदारांकडून 10 हजार रुपये स्वीकारताच तेजस वाहुळे यास एसीबीने रंगेहाथ पकडले.
एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शलनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस व सहकार्रूांनी ही कारवाई केली. याप्रकरणी धारुर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.
Tags:
Maharashtra
