। नवी दिल्ली । दि.24 मार्च । देशात सद्या महागाईचा भडका उडाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे. देशात काही दिवसांपूर्वीच पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे महागाई वाढत नव्हती. मात्र, निवडणुका संपताच देशात महागाई वाढू लागली आहे.
त्यामुळे या देशातल्या महागाईला केवळ निवडणुकाच थांबवू शकते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. इंधनाच्या वाढलेल्या किमतींवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची खिल्ली उडवली आहे.
'इंधन दरवाढ रोखण्यासाठी केवळ निवडणुकाच सक्षम आहेत असे सुळे यांनी म्हणत केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. जेव्हा निवडणूका असतात तेव्हा सरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करीत नाही. त्यामुळे आमचं तर म्हणणं आहे की, आपण दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे सरकार तिकडे व्यस्त राहील परिणामी गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, अशी खोचक टिपण्णी सुळे यांनी केली.
