ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील : केंद्रीय मंत्री नारायण राणे
। मुंबई । दि.16 फेब्रुवारी । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार हल्ला चढवला.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, राऊतांनी किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
हे देखील वाचा...गायक संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन
सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. संजय राऊत यांनी ईडी अधिकार्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. हाच धागा पकडत ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील, असा जोरदार टोला राणेंनी लगावला आहे.
अखेर शर्यतीत घोडीवर झाले 'स्वार'... कोण वाचा सविस्तर
संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफा डागल्यानंतर भाजप नेत्यांनी आता राऊतांविरोधात रान उटवलं आहे. कालपासून अनेक नेत्यांनी राऊतांच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. तसेच राऊतांना अनेक सवालही केले आहेत. आता एवढं राजकारण तापलं असताना. नारायण राणे कसे गप्प बसतील.
नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांचे वाभाडे काढले आहेत. संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे.
हे देखील वाचा...दोन दिवसांच्या संपात ग्रामसेवक सहभागी होणार
संजय राऊत लोकप्रभात असताना उद्धव आणि बाळासाहेब या दोघांवरही टीका करण्याचं सोडलं नव्हतं, आता म्हणतो, माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वीदानेतू पत्रकार नाहीच, संपादक नाही. तुझी भाषा त्या गुणवत्तेची नाहीच. बेकार आरोप करतो. हा काल अस्वस्थ का झाला, हा काल असा बेजाबदार का बोलत होता, प्रवीण राऊने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर याचा थयथयाट झाला. असा घणाघातही राणेंनी केला आहे.
हे देखील वाचा...लाखो रुपयांचा अवैध दारू साठा तोफखाना पोलिसांनी केला नष्ट