। अहमदनगर । दि.16 फेब्रुवारी । निघोज येथील ज्येष्ठ नागरिक नारायण वामन लामखडे (वय ८५) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, सून, सहा नातू, दोन नाती असा परिवार आहे. निघोजचे माजी सरपंच चंद्रकांत लामखडे यांचे ते चुलते, तर ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे यांचे ते सासरे होत.
नारायणबुवा या नावाने ते प्रसिद्ध होते. ते वारकरी पंथाचे होते. आळंदी आणि पंढरपूरची वारी ते कधीच चुकवत नसत. मुंबईत ते मासेमारी करणाऱ्यांना बर्फ पुरवण्याचे काम करीत. गेल्या १४ वर्षांपूर्वी त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली. जीवनात अनेक आघात पचवूनही ते उभे राहिले.
अतिशय गरीबीतून त्यांनी प्रगती केली. अतिशय धार्मिक आणि संयमी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी अनेकांना मदत केली.
Tags:
Ahmednagar