। अहमदनगर । दि.18 फेब्रुवारी । मद्यपी मुलाने वडिलांना बेदम मारहाण केल्याने त्यांचे दोन दात पडले व तोंडही फुटले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जामखेडला ही घटना घडली.
याबाबतची माहिती अशी की, जामखेड येथील तपनेेशर गल्ली येथे राहणारा तरुण सचिन धोंडिराम रोकडे हा दारू पिवून घरी आला व जेवायला मागितले. तेव्हा त्याला बहिणीने जेवायला वाढले असता आरोपी सचिन म्हणाला की, मला शिळे अन्न नको, मला गरम गरम अन्न जेवायला पाहिजे.
तेव्हा वडील धोंडिराम बाबुराव रोकडे (वय 70, रा. तपनेेशर गल्ली, जामखेड) हे सचिन याला म्हणाले की, तू काहीएक कामधंदा करीत नाही, नुसता घरात येवून जेवतो. तू जेव्हा कामधंदा करशील, तेव्हा ताजे अन्न जेवायला माग. असे म्हटल्याने राग येवून मुलगा सचिन याने वडील धोंडिराम यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने व लाकडी काठीने मारहाण केली.
तोंडावर चापटी व बुक्क्या मारल्या. त्यामुळे वृद्ध वडील धोंडिराम यांचे दोन दात तुटले व तोंड फुटले. ही घटना जामखेड येथे राहत्या घरात घडली. जखमी वृद्ध वडील धोंडिरामरोकडे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी मुलगा सचिन रोकडे याच्याविरुद्ध जामखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक कुरेशी करीत आहे.
Tags:
Ahmednagar