। अहमदनगर । दि.18 फेब्रुवारी । नगर तालुक्यातील मांडवे येथील विठ्ठल बळीराम होळकर यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 85 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मागील आठवड्यात त्यांना प्रकृती अस्वास्थ जाणवल्याने नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दैनिक समाचारचे उपसंपादक भाऊसाहेब होळकर व बांधकाम ठेकेदार राजेंद्र होळकर यांचे ते वडील होत.
Tags:
Ahmednagar