। नवी दिल्ली । दि.19 फेब्रुवारी । एक्सचेंजच्या मते, सोन्याचा वायदा भाव जानेवारी 2021 पासून सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. जगभरात वाढती महागाई आणि शेअर बाजारांवर पडणारी जोखीम यामुळे सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दराने 50,400 ची पातळी ओलांडली, जी एका वर्षातील सर्वोच्च पातळी आहे.
एक्सचेंजच्या मते, सोन्याचा वायदा भाव जानेवारी 2021 पासून सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भावही 1,900 डॉलर प्रति औंसवर पोहोचला. गेल्यावेळी जून 2021 मध्ये या पातळीपर्यंत पोहोचला होता.
दरम्यान, जगभरात महागाई सातत्याने वाढत आहे. भारतातील किरकोळ महागाईचा दर 6 टक्क्यांच्या पुढे गेला असताना, अमेरिकेत तो 40 वर्षांच्या विक्रमी पातळीवर आहे.2022 मध्ये आतापर्यंत सोने 3.6 टक्क्यांनी महागले आहे. सोन्याच्या दरातील ही 2020 नंतरची सर्वात जलद वाढ आहे. त्यानंतर कोरोना महामारीच्या दबावाखाली सोन्याने विक्रमी पातळी 2,100 डॉलर प्रति औंसपर्यंत गाठली होती.
Tags:
Breaking