बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी


। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथील महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे 14 वर्षी
य मुलावर बुधवारी सकाळी तर प्रतापपूर येथे 36 वर्षीय तरुणावर सोमवारी सांयकाळी बिबट्याने प्राणघातक हल्ला केला आहे.

आश्वी बुद्रुक - निमगावजाळी रस्त्यालगत जिल्हा परिषद सदंस्या अ‍ॅड. रोहिणी किशोर निघुते यांची वस्ती व संजय कुलथे याच्या शेतीलगत विकास (विजय) गायकवाड याची वस्ती आहे.

सकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांचा 14 वर्षाचा मुलगा प्रतिक हा जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात चालला होता. त्यावेळी शिकारीच्या शोधात झुडपात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने प्रतिकवर हल्ला करत डोके, कान व डोळ्याजवळ खोलवर गंभीर जखमा केल्या.

यावेळी प्रतिकने बिबट्याचा जोरदार प्रतिकार करत आपली सुटका करुन घेत घराकडे धाव घेतली. त्यामुळे प्रतिकचा भाऊ तेजस गायकवाड व गौरव गायकवाड यांनी उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Post a Comment

Previous Post Next Post