प्राचार्य प्रकाश कराळे यांना मातृशोक


। अहमदनगर । दि.24 फेबु्रवारी । नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील हिराबाई भिमराज कराळे यांचे सोमवारी (दि.21) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, दोन सुना, नातवंडे, दीर, भाये असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे अध्यक्ष व मराठा पतसंस्थेचे संस्थापक मानद सचिव प्रकाश कराळे यांच्या त्या मातोश्री होत.

अत्यंत मनमिळावू स्वभाव व धार्मिक कार्यात अग्रेसर असणार्‍या हिराबाई कराळे या सारसनगर व सर्व कापूरवाडी परिसरात नाणी आणि आजी नावाने प्रसिद्ध होत्या. पुणे येथील विश्वमाता फाउंडेशन च्या वतीने 2013 ला स्वर्गीय हिराबाई कराळे यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सोमवारी सायंकाळी कापूरवाडी-दत्तवाडी मळा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, संचालक उत्तमराव घोगरे पाटील, संचालक दादासाहेब जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, नगरसेवक प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, सोनई येथील बी. एम. दरंदले, प्राचार्य रवींद्र चौभे, राज्य टंकलेखन संघटनेचे महासचिव हेमंत ढमढेरे, कोषाध्यक्ष सुभाष बागड, राष्ट्रवादीचे युवा नेते अध्यक्ष रोहिदास कर्डिले, मराठा पतसंस्थेचे माजी चेअरमन इंजि. बबनराव खिलारी, कापूरवाडीचे सरपंच संभाजी भगत आदी उपस्थित होते.

अहमदनगर शहर वकील संघटनेचे माजी अध्यक्ष शेखर देवराव दरंदले पाटील व पंडित दीनदयाळ नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक नीलेश लाटे यांच्या त्या सासू होत.

Post a Comment

Previous Post Next Post